शरद फाउंडेशन तर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबीर
जनता न्यूज l दि. २६/६/२०२३
शरद फाउंडेशन, कुंडल संचलीत शरद आत्मनिर्भर अभियान पलूस, कडेगाव तसेच जिल्हा परिषद गट वांगी यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबीर उदघाटन सोहळा शरद लाड यांचे हस्ते संपन्न झाला..
दर महिन्याला अशा पद्धतीचे रक्तदान शिबीर आयोजित करून रक्ताचा तुटवडा भासू न देण्याचा संकल्पच या माध्यमातून पलूस कडेगाव चे युवा नेते मा. शरद लाड यांनी केला आहे. त्याचप्रमाणे या माध्यमातूम पलूस - कडेगाव मधील गरजू व्यक्तींना रक्तपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमासाठी रामचंद्र देशमुख,महेंद्र करांडे, रमेश एडके, वैभव पवार, जगदीश महाडीक, सुरेश शिंगटे, रविंद्र मोहिते पाटील, हबीब पटवेकरी, सतीश तुपे, योगेश पवार, अजित मुलाणी, बुवाजी देशमुख, शामराव हुबाले, नितीन देशमुख, शहाजी मोरे, संभाजी बाबर, जगन्नाथ चव्हाण, विनायक महाडीक, दीपक मदने, प्रतीक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते...
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

