नील विनोद वाळवेकर.. भिलवडीचा विद्यार्थी सध्या इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये शिकतोय.
नुकत्याच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्य स्कॉलरशिप परीक्षेमध्ये एकूण सात लाख मुलांच्या मधून नीलने राज्यात 6 वा क्रमांक मिळवला.
नीलनं मिळवलेलं हे यश पहिलंच नाही.. तर यापूर्वी सुद्धा त्यानं अनेक परीक्षेमध्ये उज्वल यश मिळवलेले आहे.
केरळ राज्यातली किन्फर ही शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास साधणारी आणि CBSE बोर्डच्या सर्व प्राध्यापकांच्या संघटनेशी संलग्न असणारी संस्था आहे.या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी बारावीपर्यंतच्या मुला-मुलींसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत व्हावा यासाठी ही संस्था काम करते. संपूर्ण भारतातील विद्यार्थी किन्फरच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये भाग घेतात. यामध्येही निलने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
गोरे फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने आयोजित गणित आणि शास्त्र विषयावर आधारित ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये नीलने राज्यात पाचवा क्रमांक मिळवलाय.
पुण्याच्या विस्डम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या
विस्डम स्कॉलरशिप सायन्स परीक्षेमध्ये देशात 42 वा क्रमांक गणित परीक्षेमध्ये देशात 40 वा तर CBSE च्या वतीने घेतल्या जाणाऱ्या आर्यभट्ट गणित चॅलेंज स्पर्धेमध्ये तो देशात पहिल्या शंभरात होता.
नील आता नववीत आहे.आठवीपर्यंत मिळवलेलं हे यश आहे.स्वयंशिस्त,अभ्यासाचे नियोजन, आकलन क्षमता,नवीन शिकण्याची जिज्ञासा आणि स्वतःवरचा विश्वास यामुळे यश मिळाल्याचे निल सांगतो.
नीलला आई-वडील,बहीण याचबरोबर प्रकाश पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षकांचे प्रोत्साहन मिळत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.