Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

जनता न्यूज जनसेवेत दाखल - अपूर्व उत्साहात अनावरण संपन्न

जनता न्यूज जनसेवेत दाखल - अपूर्व उत्साहात अनावरण संपन्न 


जनता न्यूज - भिलवडी  दि.१/१/२०२३

सकारात्मक व विधायक बातम्यांना वाहिलेलं जनता न्यूज चे अनावरण मोठ्या उत्साहात आज पार पडले. सकारात्मक संकल्पना घेऊन नव्या वर्षाच्या प्रारंभी सुरू करण्यात आलेल्या जनता न्यूज या न्यूज चॅनल व न्यूज पोर्टल चा शुभारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
 
नवनवीन संकल्पना, शेती, आरोग्य, खेळ, समाजकारण,राजकारण,शिक्षण या सगळ्या क्षेत्रातील घडामोडी प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती, काही स्पेशल गोष्टी,आणि लोकांच्या मनात असलेले विविध प्रश्न नाविण्यपूर्ण रितीने मांडण्याचा या चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे.
जनता न्यूज चालू घडामोडी वर भाष्य करीत सर्वसामान्य जनतेचा आवाज होईल असे मान्यवरांनी मत व्यक्त केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदर उपक्रमास शुभेच्छा देत अपेक्षा विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या.


भिलवडीच्या सरपंच विद्याताई पाटील उद्योजक गिरीश चितळे जि.प. चे माजी सदस्य संग्राम दादा पाटील माजी सरपंच शहाजी गुरव, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहन पाटील सर आदींच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडला. 

यावेळी या नाविण्यपूर्ण संकल्पनेतून समाजाला नवी दिशा मिळेल असा विश्वास उद्योजक गिरीश चितळे यांनी व्यक्त केला. जनता न्यूज चा उपक्रम पथदर्शी असल्याचे संग्रामदादा पाटील यांनी सांगितले.जनता न्यूज चे  अमोल वंडे यांनी चॅनेल संदर्भातली सर्व माहिती दिली.त्यावेळी मोहन पाटील, मंगेश मोटे, आर.के.रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले.


जनता न्यूज डिजीटल उपक्रमात दीपक पाटील, अमोल वंडे, प्रफुल्ल कांबळे,समीर कुलकर्णी, रूपाली शिंदे कस्तुरी पाटील राहुल भस्मे योगेश कुराडे, बडकूल रोझे अशी टीम कार्यरत असणार आहे.



या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बी.डी पाटील माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील सावंतपूरचे माजी सरपंच मंगेश मोटे मोहन तावदर धनंजय पाटील व्यापारी एकताचे महेश शेटे व सचिन नावडे, ग्रामपंचायत सदस्या सीमाताई शेटे, उ.भा. सोसायटीच्या व्हा.चेअरमन मृणाल पाटील,आदर्श शिक्षिका हसीना शेख, आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. 

दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्यापारी एकताचे मुन्ना पट्टेकरी यांनी आभार मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.