Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

भिलवडीची पब्लिक ऍड्रेस सिस्टिम पाहून माजी मंत्री जयंत पाटील यांना आश्चर्याचा सुखद धक्का

भिलवडीची पब्लिक ऍड्रेस सिस्टिम पाहून  माजी मंत्री जयंत पाटील यांना आश्चर्याचा सुखद धक्का


जनता न्यूज - भिलवडी l दि.११/२/२०२३

राष्ट्रगीताचं गाव असलेल्या भिलवडी येथे राज्य मार्ग क्रमांक १५१ चे रस्त्याचे काम सुरू आहे. एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याच दरम्यान आज माजी मंत्री जयंत पाटील हे एका कार्यक्रमाकरिता भिलवडीतून जात होते.वाहतूकीची कोंडी होतीच.

याच दरम्यान राज्याचे कर्तबगार माजी मंत्री जयंत पाटील साहेब भिलवडीच्या मुख्य रस्त्यावर आहेत कृपया आपण सर्वांनी वाहतुकीची शिस्त पाळावी आणि मंत्री महोदयांना मार्गस्थ होण्यासाठी सहकार्य करावे. अशी सूचना भिलवडीच्या पब्लिक ऍड्रेस सिस्टीम वरून देण्यात आली. याचबरोबर स्पीकर वरून वाहतूक नियमानाच्या सूचना दिल्या जात असल्याचे त्यांनी पाहिले.

आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी त्यांनी गाडीची काच खाली केली आणि नेहमीच्या स्टाईलनं कौतुक मिश्रित स्मितहास्य केलं.

एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी असतानाही अवघ्या काही क्षणांमध्ये त्या सूचनांमुळे वाहतूक सुरळीत सुरू झाली.

पब्लिक ऍड्रेस सिस्टमद्वारे ग्रामस्थांना विविध सूचना, राष्ट्रगीत, मोबाईलसह विविध हरवलेले-सापडलेले  साहित्य आदीची माहिती दिली जाते. व्यापारी संघटनेच्या वतीने हा उपक्रम सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.