Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

भिलवडीत माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप

माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत उद्या घरोघरी डस्टबिन-फिनाईल आणि क्रीडा साहित्यांचे वाटप

- सरपंच विद्या पाटील  | उपसरपंच पृथ्वीराज पाटील


जनता न्यूज - भिलवडी | दि.२/१/२०२३ 

उद्या मंगळवार दिनांक ३ जानेवारी २०२३  रोजी भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी डस्टबिन वाटप आणि भिलवडीतल्या खेळाडूंना खेळ साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती भिलवडीच्या सरपंच विद्या पाटील आणि उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी दिली. सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


यावेळी जनता न्यूजशी बोलताना सरपंच विद्या सचिन पाटील आणि उपसरपंच पृथ्वीराज पाटील म्हणाले की ग्रामस्वच्छता अभियानात भिलवडीने विभागीय स्तरावर यश मिळवलेले आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये गाव जागरूक आहेच पण घरातला कचऱ्यावर रस्त्यावर न टाकता तो एकत्र करून ग्रामपंचायतीच्या घंटागाडीमध्ये टाकावा यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून प्रत्येक घरात डस्टबिन देण्यात येणार आहेत. याचबरोबर घराच्या स्वच्छतेसाठी घरोघरी फिनाइल वाटप केले जाणार आहे. 

 

या कार्यक्रमात भिलवडीतल्या कराटे हॉलीबॉल क्रिकेट फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांना लागणारे खेळाचे साहित्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिले जाणार आहे. शासनाची आरोग्य योजना असलेल्या आयुष्यमान भारत योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आणि असंघटित कामगारांसाठी असलेल्या ई श्रम कार्डाचे वाटपही यावेळी करण्यात येणार आहे.

यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भिलवडी जि.प.गटातील लोकनियुक्त नूतन सरपंचांचाही सत्कार करण्यात येणार आहे.सायंकाळी ठीक ५.०० वाजता हा कार्यक्रम भिलवडी ग्रामपंचायत प्रांगणामध्ये होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड उपस्थित राहणार आहेत.

सर्व भिलवडी व भिलवडी जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन भिलवडी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विष्णू कांबळे, मनोज चौगुले मनोहर गुरव, प्रशांत कांबळे, सप्नाली रांजणे, रेहाना फकीर, सीमा शेटे, शबाना मुल्ला, सविता पाटील, रुपाली कांबळे, रेश्मा मुल्ला उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.