भिलवडी येथे श्री कृष्णावेणी माता उत्सव संपन्न
जनता न्यूज l दि.९/२/२०२३
श्रीकृष्णावेणीमातेच्या उत्सवाला जवळ जवळ १०० वर्षापासूनची परंपरा आहे. गेली ५० वर्षे हा उत्सव माघ महिन्यात श्री राम मंदिरात साजरा होतो आहे.
कै. द भा उर्फ काका साहेब चितळे व त्यांचे कुटुंबीय यांच्या सहकार्याने व गावातील प्रतिष्ठित मंडळी यांच्या मार्गदर्शना खाली उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा होत आहे.
पहिल्या दिवशी घाटावरून कृष्णा नदीचे पाणी जल कुंभातून विधिवत वाजत गाजत श्रीराम मंदिरामध्ये आणून त्याची व उत्सव मूर्तीची पालखीतून सवाद्य गांवातून मिरवणूक काढून श्री राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते.
रोज सकाळ-संध्याकाळ पूजा, आरती होते. तसेच पाच दिवस भजन, कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम होतात- शेवटचे दिवशी महाप्रसाद केला जातो. व उत्सवाची सांगता होते
हा उत्सव सन्मित्र सांस्कृतिक मंडळा मार्फत दरवर्षी साजरा केला जातो. मंडळाचे काम अध्यक्ष श्री. ज. कृ.केळकर श्री. रविंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष, श्री प्रशांत बापू भा जोशी कार्यवाह मंडळाचे मार्गदर्शक गिरीश चितळे व सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.