भिलवडी जि.प.मराठी शाळेला गतवैभवासाठी हवी लोकसहभागाची साथ
शिक्षणाचा पाया ज्या ठिकाणी घट्ट होतो ती म्हणजे प्राथमिक शाळा.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांबाबत अनास्था आणि शाळांची दुरावस्था पाहता मॉडेल स्कूलची कल्पना खरोखरच प्रशंसा करण्यासारखी आहे.
भिलवडी जि.प.शाळा म्हणजे एकेकाळी नावलौकिक असलेली शाळा. सुमारे ४४ शिक्षक या शाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण द्यायचे. त्यांच्या हाताखाली घडलेली मुलं आज मोठ्या पदावर आहेत याचा सार्थ अभिमान आहे.
गेल्या शनिवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत गेल्यानंतर काहीतरी करावं ही इच्छा बळावली. कागदाची.. लाकडाची..मातीची..कुठलीही तुम्हाला सुचेल ती वस्तू तयार करून आणा.. असं मुलांना सांगितलेलं होतं.. मुलांनी खूप चांगल्या वस्तू तयार करून आणलेल्या होत्या.
त्याहीपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास होता..काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळत आहे तो खास होता.
सदैव जनतेसोबत असणारे आपले मार्गदर्शक आदरणीय आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांकडे वह्यांची मागणी दीपक पाटील यांनी केली. त्यांनी लगेचच वह्या-पेन पाठवूनही दिले.
मुलांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद आणखी एक ऊर्जा देऊन गेला. आता प्रत्येक शनिवारी एक उपक्रम जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये घेण्याचे निश्चित केलेलं आहे.
या मुलांसाठी काही करू इच्छिणाऱ्यांनी आणि शाळेला गतवैभव मिळवून देण्यासाठी सुद्धा ज्यांना प्रयत्न करावेसे वाटतात त्यांना विनंती आहे, आपण सर्वजण मिळून या शाळेसाठी काहीतरी करूया.
या शाळेसाठी योगदान द्यायची इच्छा असेल तर जरूर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र मोहिते,सदैव तत्पर असणारे आमचे सहकारी अमोल वंडे यांची मदत लाभली.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी संतोष चौगुले, कपिल शेटे, बापू जगताप यांच्यासह मुख्याद्यापिका सुनीता माने,शिक्षिका सविता मगदूम,शिक्षिक शीतल महाडिक, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक सागर कदम यांनी आभार व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.