Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते उद्या भिलवडीत विविध विकासकामांचा शुभारंभ


लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते उद्या भिलवडीत विविध विकासकामांचा शुभारंभ

जनता न्यूज l दि.२३/६/२०२३

उद्या शनिवार दि. 24 जून 2023 रोजी राज्याचे माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ संपन्न होत आहे.

सामाजिक न्याय, नागरी सुविधा, 15 वा वित्त आयोग, आणि आमदार फंडातून ही विकास कामे संपन्न होणार आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी सायं.ठीक 6.30 वाजता भिलवडी ग्रामपंचायतीजवळ उपस्थित रहावे असे आवाहन भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या पाटील आणि उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.

उद्या खालील विकास कामांचा शुभारंभ संपन्न होणार आहे.

 वॉर्ड क्र. 3- तानाजी मोकाशी बोळ बंदिस्त गटर व रस्ता काँक्रिट करणे.

वॉर्ड क्र. 4- वाचनालयाजवळ  बंदिस्त गटर व पेविंग ब्लॉक बसविणे.

वॉर्ड क्र. 6- पेट्रोल पंपाच्यामागे बंदिस्त गटर व रस्ता काँक्रिट करणे. 

वॉर्ड क्र. 6- मौलानानगर आर.सी.सी. गटर बांधकाम करणे

वॉर्ड क्र.1- पंचशीलनगर अंतर्गत बंदिस्त गटर करणे.

वॉर्ड क्र. 2- दत्ता पाटील ते वसंत कदम घर रस्ता काँक्रिट करणे.

वॉर्ड क्र. 6- दत्तनगर सपकाळवाडा रस्ता काँक्रिट करणे.

ग्रामपंचायतीसमोरील बंदिस्त गटर व रस्ता डांबरीकरण करणे.

सर्व ग्रामस्थांना वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.