Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

सावंतपुरच्या लोकहिताच्या विकास कामांच्या मागण्या पूर्ण करण्याचे किर्लोस्कर उद्योग समूहाच्या वतीने आश्वासन

सावंतपुरच्या लोकहिताच्या विकास कामांच्या मागण्या पूर्ण करण्याचे किर्लोस्कर उद्योग समूहाच्या वतीने आश्वासन

जनता न्यूज | शुक्रवार - दि.  १६ जून २०२३


सावंतपुरच्या लोकहिताच्या विकास कामांच्या संदर्भात किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड किर्लोस्करवाडी चे व्यवस्थापकीय प्रमुख मा. डोनवडे साहेब यांच्याशी र गावच्या विविध विकास कामांविषयी नुकतीच भेट घेण्यात आली. 

प्रामुख्याने 

१ ) श्रमिक बझार चौकातील बसस्थानकाची डागडुजी करून रंगकाम करण्यात यावे ..

२ ) श्रमिक बझार ( किर्लोस्कर गेट ) चौकात रात्रीचे वारंवार होणारे अपघात या धर्तीवर हायमास्ट लॅम्प बसवावा.. 

३ ) कामगार आणि पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी किर्लोस्कर कंपनीच्या संरक्षण भिंतीच्या बाजूने स्ट्रीट लाईट उभा करून द्यावी ...

४ ) किर्लोस्कर कंपनीच्या संरक्षण भिंतीच्या बाजूने फूटपाथ करण्यात यावा...

५ ) CSR फंडाच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामे करण्यात यावी...

६ ) सावंतपूर गावातील स्थानिक युवकांना नोकर भरती करताना प्राधान्य द्यावे ...


अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या . लवकरच प्राधान्याने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी किर्लोस्कर प्रशासनाने दिले

यावेळी सावंतपूर गावचे ज्येष्ठ नेते माननीय गणपतराव तात्या सावंत ( संचालक वसंतदादा सहकारी साखर कारखाना सांगली ) , सावंतपूर गावचे उपसरपंच माननीय विकास भैय्या जाधव , सावंतपूर गावचे माजी उपसरपंच श्रीधर दादा जाधव , सावंतपूर गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेश मोटे, आलोक खंबाळे , शुभम जाधव हे उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.