माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या सांत्वनपर भेटी..घरी जाऊन कुटुंबीयांना दिला धीर..
माजी मंत्री आ.डॉ. विश्वजीत कदम यांनी आज भिलवडी मध्ये सांत्वनपर भेटी दिल्या.कुटुंबीयांना धीर देण्याबरोबर त्यांच्या दुःखात ते सामील झाले.
पत्रकार अभिजीत रांजणे यांच्या मातोश्री कांताबाई रांजणे, दलित महासंघाचे नितीन मोरे यांचे वडील विलास मोरे, व्यापारी राजेंद्र तेली यांच्या मातोश्री सुमन तेली, जुने जाणते खेळाडू उस्मानगणी मिर्झा यांच्या पत्नी शाहिदा, बजरंग कांबळे यांच्या पत्नी ग्रामपंचायतच्या माजी सदस्या कमलताई कांबळे, उमेश सावंत यांचा मुलगा मयूर, हारूणरशीद मुल्ला यांच्या पत्नी शाहीन आणि धीरज पाटील यांचे वडील श्रीकांत पाटील यांचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले होते.
मयूर सावंत याच्या अपघाती मृत्यूने भिलवडी आणि परिसर हळहळला होता.
आज विश्वजीत कदम यांनी सर्वांच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला आणि या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी भिलवडीचे नेते संग्राम पाटील, बाळासो मोहिते, विलास पाटील, चंद्रकांत पाटील,बी.डी.पाटील बाबासो मोहिते, धनंजय पाटील उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.