दि. 10 एप्रिल 23
अपघातांची मालिका सुरूच..
आठवडाभरात 5 वा अपघात..
गतिरोधक झालेच पाहिजेत..
चांगले गुळगुळीत रस्ते.. खड्डे नसणारे रस्ते असावेत असं आपल्याला वाटतं. पूर्वी शहरात असे रस्ते पाहून आपल्याला हेवा वाटायचा.पण आता गावोगावी चकाचक रस्ते होताहेत. काँक्रेटचे रस्ते होत आहेत. त्यामूळे प्रवास गतिमान झालाय.अंतर लवकरात लवकर कापले जात आहे. आणि त्या ओघात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
आष्टा ते भिलवडी स्टेशनपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे.या मार्गावर असणारी खंडोबाचीवाडी,माळवाडी,भिलवडी अंकलखोप ही गावे या राज्यमार्गालगत येतात.भिलवडीत तर प्रत्येक गल्ली मुख्य रस्त्याला जोडली आहे.अशा वेळी अंदाज न आल्याने अपघात होतात.
आजचा अपघात असाच झाला.मंगळवेढा येथील तरुण राज्यमार्गावरून जात असताना ग्रामपंचायत कमानीतून येणाऱ्या चारचाकीने त्याला धडक दिली.
औदुंबर,दौलतनगर फाटा येथेही चार चाकी वाहने एकमेकांना धडकून अपघात झाला.खंडोबाचीवाडी येथील अपघातात एक लहान मुलगा मरण पावला.
वेग वाढलाय तसे अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे.
दिशादर्शक फलकांच्या माध्यमातून वाहतुकीचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.त्यात बदल करण्याची गरज आहे.
गती कमी करणारे गतिरोधक हवेत.
शाळेजवळ केलेल्या अर्ध्या-निम्म्या गतिरोधकाचा काही उपयोग नाही.त्याने रस्ता चांगला दिसतो एवढंच..
भिलवडीत किमान तीन ठिकाणी गतिरोधक हवेत. माळवाडीच्या मुख्य चौकात,खंडोबाच्यावाडीच्या शाळेजवळ,स्टॅन्डजवळ,नागठाणे फाटा या ठिकाणी सुद्धा गतिरोधकाची आवश्यकता आहे.
गतिरोधकाने सुद्धा अपघात होतो असं प्रशासनाला पटवून देऊन गतिरोधक सुद्धा कमी केलेले आहेत.पण होणारे पक्के गुळगुळीत रस्ते बघता गतिरोधकाची नितांत गरज आहे हेच खरे.
वाहनधारकांनी सुद्धा आपली वेग मर्यादा किमान गावात असताना तरी मर्यादित ठेवली पाहिजे हे ही तितकच खरं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.