धनगांवच्या पोलिस पाटील पदी सौ.मनिषा मोहिते यांची निवड
जनता न्यूज - भिलवडी l दि.१३/४/२०२३
धनगांव ता.पलूस गावच्या पोलिस पाटील पदी सौ.मनीषा सुनिल मोहिते यांची निवड झाली. कडेगाव विभागाचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी ही निवड जाहीर केली.धनगांव मधील नागरिक व ग्रामपंचायतीच्या वतीने या यशाबद्दल सरपंच सतपाल साळुंखे यांच्या हस्ते अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
प्रशासनाने गुणवत्तेच्या निकषावर मला गावाची सेवा करण्याची संधी दिली आहे.सर्वांना विश्वासात घेऊन लोकाभिमुख पद्धतीने व पारदर्शीपणाने मला नेमून दिलेली जबाबदारी पार पडणार असल्याचे मनोगत पोलीस पाटील सौ. मनिषा मोहिते यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
पोलीस पाटील पदाच्या परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व महिला उमेदवारांचा यावेळी ग्रामपंचायती मार्फत सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच सौ.आशाताई केवळे, सौ.कुसुम साळुंखे, सौ.काजल मदने, संदिप यादव, हणमंत यादव, उदय साळुंखे, दिपक भोसले, दत्ता उतळे, दत्तात्रय यादव, सुनिल मोहिते, विष्णुपंत कुर्लेकर, रविंद्र साळुंखे, हिरूगडे, संभाजी साळुंखे, प्रकाश यादव, दिलीप मोहिते, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.