Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

भिलवडी परिसरातील मीठारकी शेती क्षारपडमुक्त करण्यासाठीच्या हालचाली सुरू. संजय काकांनी दिली गती.. सुरेंद्र वाळवेकरांचा पाठपुरावा.


भिलवडी परिसरातील मीठारकी शेती क्षारपडमुक्त करण्यासाठीच्या हालचाली सुरू | संजय काकांनी दिली गती..सुरेंद्र वाळवेकरांचा पाठपुरावा.

जनता न्यूज | भिलवडी - दि.२५/०४/२०२३ 

महाराष्ट्र शासन जलसंपदा यांत्रिकी विभाग सांगली यांच्यामार्फत भिलवडी व परिसरातील जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी नाले रुंदीकरण खोलीकरण व सफाई या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 

नाल्याच्या सफाई रुंदीकरण व खोलीकरण करणे या सर्व कामाचा खर्च महाराष्ट्र शासन जलसंपदा यांत्रिकी विभाग सांगली यांच्याकडून करण्यात येत आहे. भिलवडी परिसरामध्ये किमान दोन हजार एकर क्षेत्राला याचा फायदा होईल.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्याकडे परिसरातील शेतकऱ्यांनी या जमिनी क्षारपडमुक्त व्हाव्यात यासाठी मागणी केलेली होती. त्यांनी ही मागणी खासदार संजय काका पाटील यांच्या जवळ लावून धरली.

क्षारपड निर्मूलनासाठी पहिल्या टप्प्यात नाला सफाई, खोलीकरण, रुंदीकरण या कामास प्रारंभ करण्यात आला.



दुसऱ्या टप्प्यामध्ये सचिद्र पाईप बसवण्याचे काम लवकरात लवकर सुरू केलं जाणार आहे. याचा सर्व खर्च शासन करणार असून शेतकऱ्याला कुठलीही आर्थिक तोशिस सहन करावी लागणार नाही असे आश्वासन खासदार संजय काका पाटील यांनी दिले आहे. 

गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल खासदार संजय काका पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांचे परिसरातील शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.