जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली यांच्या वतीने फेस योगा प्रशिक्षण संपन्न
जनता न्यूज - भिलवडी | दि.१०/०३/२०२३
जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली यांच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने महिला-मुलींसाठी फेस योगा प्रशिक्षण कार्यक्रम जानकीबाई चितळे हॉल येथे आयोजित केला.
प्रारंभी जायंट्स ग्रुपची प्रार्थना झाली. सहलीच्या अध्यक्षा सीमा शेटे यांनी सर्वांचे स्वागत केले.डॉ.श्रेया शिंदे यांनी फेस योगाप्रशिक्षण बाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की या फेस योगामुळे त्वचा चमकदार होते,रक्त प्रवाह वाढतो. त्वचा मुलायम होऊन वंगाचे डाग पूर्णपणे कमी होतात.
यावेळी सहेली ग्रुपच्या मार्गदर्शिका सुनिता चितळे,भक्ती चितळे याचबरोबर सहेलीच्या पदाधिकारी उज्वला परीट,अनिता गुरव,सविता महिंद-पाटील उपस्थित होत्या.
सुमारे ५० महिलांनी या शिबीराचा लाभ घेतला.उपाध्यक्षा स्मिता वाळवेकर यांनी आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.