महिला दिनानिमित्त डॉ.आशा गाझी यांचे व्याख्यान संपन्न
ग्रामपंचायत,बचत गट आणि दिशा फाउंडेशन यांचा उपक्रम
जनता न्यूज -भिलवडी | दि.१०/०३/२०२३
जागतिक महिला दिनानिमित्त खंडोबाचीवाडी आणि माळवाडी येथे आज ग्रामपंचायत,बचत गट आणि दिशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री रोगतज्ञ डॉ.आशा गाझी यांचे व्याख्यान आयोजित केले.
महिला सक्षमीकरण त्यांचा आचार,विचार,आहार आणि आरोग्य विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
दिशा फाउंडेशन च्या वतीने डॉ.आशा गाझी यांच्यासह बचत गटातील कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.माळवाडी येथे विविध स्पर्धा, पाककलेचे स्टॉल, रॅम्प वॉक अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होते .
या कार्यक्रमाला बचतगटातील महिलांसह ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.