भिलवडी जि.प.गटासाठी तब्बल 18.50 कोटीचा निधी मंजूर
जनता न्यूज l दि.१०/३/२०२३
खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्या पाठपुराव्याने भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये 18 कोटी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंजूर कामे आणि निधी पुढीलप्रमाणे-
गारपिर ते भिलवडी स्टेशन रस्ता ग्रा.मा. 51 रस्ता सुधारणा करणे 3 कोटी रुपये,
खटाव सटवाई रस्ता ग्रा.मा. 22 रस्ता सुधारणा करणे 3 कोटी 50 लाख रुपये,
भिलवडी स्टेशन ते वसगडे प्रा.जी.मा. क्रमांक 122 रस्ता सुधारणा करणे 3 कोटी 50 लाख,
माळवाडी वसगडे रस्ता प्रा.जी.मा. क्रमांक 33 कॅनॉलवर लहान पूल बांधणे 2 कोटी 50 लाख रुपये,
नागाव ते वसगडे रस्ता रुंदीकरण करणे 3 कोटी रुपये ,
चोपडेवाडी ते कदमवस्ती रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाख 82 हजार रुपये
यासाठी माजी जि.प.सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.
जि.प.गटातील ब्रम्हनाळ ,वसगडे, खटाव, चोपडेवाडी, माळवाडी गावातील नागरिकांनी खासदार संजय काका पाटील आणि माजी जि.प.सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांचे विशेष आभार मानले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.