पलूस तालुक्यात अर्थसंकल्पात ३२ कोटी ५० लाख मंजूर - आ. डॉ. विश्वजीत कदम
जनता न्यूज - पलूस l प्रतिनिधी
जनतेने केलेल्या मागणीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने पलूस तालुक्यातील रस्ते व पूलांच्या कामासाठी ३२ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. अशी माहिती माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.
पलूस तालुक्यातील विकास कामांसाठी यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे. सरकार कोणाचेही असो, आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी सरकारकडून निधी आणला पाहिजे. अशी भूमिका स्व. आमदार डॉ. पतंगराव कदम यांची होती. सद्या सरकार बदलले असले तरी या सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. विकासकामासाठी निधी मंजूरीसाठी माझा राज्य सरकारकडे वेळोवेळी मागणी व पाठपुरावा असतो. त्यामुळे निधी मंजुरीसाठी अडचण येत नाही. असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
पलूस तालुक्यातील रस्ते, पूल व ईतर विकासकामासाठी कधीच निधी कमू पडू देणार नाही. पलूस तालुक्यातील विविध रस्त्याच्या कामाची मागणी जनतेतून होत होती. त्यासाठी राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. सदर रस्त्यांच्या व काही पूलांच्या कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने ३२ कोटी ५० लाख रूपये मंजूर केले आहेत. असे आमदार डॉ. कदम यांनी सांगितले.
रस्ते , पूल व त्यासाठी मंजूर झालेला निधी पुढीलप्रमाणे :
नागांव ते रस्ता रूंदीकरण करणे व आरसीसी गटर बांधणे ( ३ कोटी ), खोलेवाडी ते बुर्ली पुलाच्या जोड रस्त्याची सुधारणा करणे ( ५ कोटी ), पलूस तालुका हद्द ते बांबवडे रस्ता सुधारणा करणे ( ५ कोटी ), भिलवडी स्टेशन ते वसगडे रस्ता सुधारणा करणे ( ३ कोटी ५० लाख ), आंधळी फाटा चौकाची सुधारणा करणे ( ७५ लाख ), आंधळी ते आंधळी फाटा व पलूस ते सावंतपूर रस्ता सुधारणा करणे ( १ कोटी ), नागठाणे ते सूर्यगाव रस्ता सुधारणा ( ७५ लाख ), तालुका हद्द ते बांबवडे रस्ता सुधारणा ( १ कोटी ) , आमणापूर ते येळावी रस्ता सुधारणा ( ७५ लाख), माळवाडी - वसगडे दरम्यान कँनाँलवर लहान पूल बांधणे ( २ कोटी ५० लाख ), अंकलखोप ओढ्यावर लहान पुल बांधणे ( २ कोटी ७५ लाख ), खटाव सटवाई रस्ता सुधारणा करणे ( ३ कोटी ५० लाख ), ब्रम्हनाळ ते भिलवडी स्टेशनरस्ता भाग - ब्रम्हनाळ ते गारपीर ( ३ कोटी ).
पलूस तालुक्यातील इतर काही रस्ते, पूल, गटार कामांसाठी आणखी निधी मंजूरीसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.