जनता न्यूज | दि. १३/३/२०२३
अँड द ऑस्कर गोज टू.. तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस.. भारताच्या ' द एलिफंट व्हिस्परर्स ’या माहितीपटाने पटकावला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार तर ' आरआरआर ' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला बेस्ट ओरिजनल गाण्याचा ऑस्कर पुरस्कार..
कार्तिकी गोन्सालवेस आणि गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीला यंदाच्या ऑस्कर्समध्ये बेस्ट डॉक्युमेंट्री ऑन शॉर्ट सब्जेक्ट हा पुरस्कार मिळाला आहे.
ही डॉक्युमेंट्री मदुमलाई अभयारण्यातल्या रघू नावाच्या एका अनाथ हत्तीच्या पिल्लाची कहाणी सांगते.
बोम्मन आणि बेल्ली हे आदिवासी कुटुंब त्याची काळजी घेतं. मानव-प्राणी यांचं भावविश्व हळूवारपणे या डॉक्युमेंट्रीत उलगडून दाखवलं आहे.
द एलिफंट व्हिस्परर्स’ ही या कॅटेगरीत पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म ठरली.
लोकप्रिय ' आरआरआर ' चित्रपटाने आज इतिहास रचला. या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला बेस्ट ओरिजनल गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
यामुळे पुन्हा एकदा भारतीय चित्रपटाने जगभर आपला डंका वाजवला आहे. यावर्षी दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ' आरआरआर ' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले हाेते. या श्रेणीत नामांकन मिळवणारा RRR हा पहिला भारतीय चित्रपट आहे.
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा 'आरआरआर' प्रेक्षकांसमोर आल्यानंतर या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या काल्पनिक कथेवर हा सिनेमा बेतलेला आहे.
नाटू नाटू गाणे गाणे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एम.एम. किरावानी यांनी संगीतबद्ध केले. कला भैरवी आणि राहुल सिपलीगुंज यांनी हे गीत लिहिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.