भिलवडी परिसरात श्री स्वामी समर्थ प्रगटदिन उत्साहात साजरा
जनता न्यूज | दि.२५/३/२०२३
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालविकास दिंडोरी प्रणित केंद्र भिलवडी आणि खंडोबाचीवाडी येथे आपल्या स्वामी समर्थ महाराज प्रगटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भिलवडी येथे यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. खंडोबाचीवाडी येथे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक आणि महाआरती संपन्न झाली.
यावेळी उपस्थितानी स्वामी समर्थ सेवामार्गात आलेले अनुभव व अनुभूती सांगितले. यानंतर मांदियाळी पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित सेवेकरी यांना वसंत धोतरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शन व प्रश्र्नोत्तरांची सेवा रूजू केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.