'ही' कामे 31 मार्चपूर्वी उरकून घ्या, अन्यथा..!
जनता न्यूज | दि.२३/३/२०२३
चालू वित्त वर्षातील अग्रीम कर (ॲडव्हान्स टॅक्स) जमा करण्यासह एकूण ७ कामे ३१ मार्चपूर्वी करणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : ३१ मार्च २०२३ रोजी चालू वित्त वर्ष (२०२२-२३) संपत आहे. १ एप्रिल २०२३ पासून नवे वित्त वर्ष सुरू होईल. चालू वित्त वर्षातील अग्रीम कर (ॲडव्हान्स टॅक्स) जमा करण्यासह एकूण ५ कामे ३१ मार्चपूर्वी करणे आवश्यक आहे.
१) टीडीएसचे नियम १ एप्रिलपासून बदलणार ऑनलाइन गेमिंग, गॅम्बलिंग, बेटिंग, फँट्सी स्पोर्ट्स यात जिंकलेल्या रकमेवर १ एप्रिलपासून सरसकट टीडीएस कपात होईल. मार्केट लिंक्ड डिंबेचरच्या व्याज भरण्यावर मिळणारी टीडीएस कपातीतील सवलत संपेल. ईपीएफ काढताना पॅन क्रमांक न दिल्यास २० टक्के टीडीएस लागणार आहे. एनआरआय आणि विदेशी कंपन्यांना केलेल्या अदायगीवर २० टक्के टीडीएस लागणार आहे. विदेशी समभागांतील गुंतवणूक आणि रेमिटन्स यावरील टीडीएस ५ टक्क्यांवरून २० टक्के होईल.
२) सोने खरेदीचे नियमही बदलणार ३१ मार्चनंतर ४ अंकी हॉलमार्क असलेले दागिने विकता येणार नाही. १ एप्रिल २०२३ पासून केवळ ६ अंकी हॉलमार्क असलेले दागिनेच विकता येतील.
३) कर बचत गुंतवणूक वित्त वर्ष २०२२-२३ साठी जुन्या कर व्यवस्थेत कर सवलत प्राप्त करण्यासाठी ३१ मार्चपूर्वी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पीपीएफ, ईएलएसएस, युलिप, एनपीएस इत्यादी योजनांत ही गुंतवणूक केली जाऊ शकते.
४ ) फॉर्म १२ बीबी गुंतवणुकीवरील कर सवलतीसाठी वेतनधारक कर्मचाऱ्यांनी कंपनीला फॉर्म १२ बीबी ३१ मार्चपूर्वी भरून द्यावा. यात एचआरए, एलटीसी आणि गृहकर्ज यांची माहिती दिली जाऊ शकते.
५) सुधारित आयटीआर आढावा वर्ष २०२०-२१ साठी सुधारित आयकर विवरणपत्र (आयटीआर) ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे. आयटीआर भरले नसेल अथवा त्यात त्रुटी असतील, तर सुधारित आयटीआर भरा.
६) अग्रीम कर १० हजार रुपयांपेक्षा अधिक कर देयता असलेल्या करदात्यांना वर्षातून ४ वेळा आगाऊ कर भरावा लागतो. आगाऊ कराचा चौथा हप्ता ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे.
ही कामे ३१ मार्चपूर्वी नक्की उरकून घ्या..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.