वसगडे ता.पलूस येथे रास्ता रोको चक्काजाम आंदोलन
जनता न्यूज l दि.२१/२/२०२३
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यासह तालुक्यातील प्रमुख ठिकाणी बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी ठीक 11.30 वाजता भव्य रस्ता रोको होणार आहे.
संदीप राजोबा यांच्या - प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे
१) थकीत विज बिलापोटी शेती वीज कनेक्शन तोडण्याचे सत्र सुरू आहे. ते ताबडतोब थांबवावे व संभाव्य वीज दरवाढ थांबवा
२) कृषी संजीवनी योजनेस मुदत वाढ देऊन ( ३१ मार्चपर्यंत ) ५०% वीज बिल भरून मागील वीज बिल सर्व थकीत शेतक-यांना मुक्त करावे.
३) ऊस तोडणी मुकादमाकडून ऊस तोडण्यासाठी शेतकर्यांची व वाहन मालकांची कोट्यवधी रूपये लुबाडले जात आहे ते तात्काळ थांबले पाहिजे
३) ५० हजार प्रोत्साहन अनुदानाच्या नुसता याद्या जाहीर करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे वर्ग करा.
४) अतिवृष्टी व महापुरामुळे मुळे शेतीचे व राहत्या घरांचे नुकसान झालेल्या तसेच फेरपंचनामा झालेल्या घरांना नुकसान भरपाई मिळावी
जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील , अजित पाटील या आंदोलनासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत
या विषयावर वसगडे येथे दि. 22 फेब्रुवारी रोजी ठीक 11.30 वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहे तरी बहुसंख्येने शेतकरी बंधू भगिनी तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.