उद्योजक मकरंद चितळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालयास अर्थिक मदत
वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक-शैक्षणिक संस्थांना मदत करण्याची चितळे कुटुंबीयांची परंपरा कायम
जनता न्यूज l दि.२३/२/२०२३
चितळे उद्योग समुहाचे संचालक व भिलवडी वाचनालयाचे आजीव सभासद मा.मकरंद चितळे यांनी सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेस एक लाख (रु.१,००,०००) रुपयांची देणगी दिली.
या बहुमोल देणगी बद्दल वाचनालयाच्या वतीने ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विश्वस्त जी.जी.पाटील यांनी देणगीचा धनादेश स्विकारला.
या देणगीचा विनियोग निश्चितपणे वाचनालयाच्या चौफेर प्रगतीसाठी केला जाईल अशी ग्वाही कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिली.
यावेळी मा.मकरंद चितळे यांचे हस्ते राष्ट्र संत गाडगेबाबा यांचे जयंती निमित्त गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणेत आले. मा.गिरीश चितळे यांनी गाडगेबाबांच्या चरित्रातील काही प्रसंग सांगितले. यावेळी दिशा फाऊंडेशन भिलवडीचे श्री .सचिन देसाई यांनी वाचनालयास बालसाहित्याची २० पुस्तके भेट दिली, या बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष श्री .गिरीश चितळे कार्यवाह सुभाष कवडे,संचालक डी.आर.कदम,हणमंत डिसले व महादेव जोशी व सर्व सेवक व वाचक उपस्थित होते. ज.कृ.केळकर यांनी आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.