भिलवडीत शिवजयंती निमित्त आयोजित स्पर्धांचा निकाल जाहीर
एसएमएस किंवा व्हाट्सअप करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पाठवायची होती या स्पर्धेमध्ये भिलवडी आणि परिसरातील सुमारे १५८ जणांनी सहभाग घेतला.
प्रश्नमंजुषा स्पर्धा विजेते :
१) प्रथम क्रमांक-समीर तापेकरी
२) द्वितीय क्रमांक-श्रीराम रमेश गौडर
३) तृतीय क्रमांक-फिरोज आदम मुल्ला
याचबरोबर छत्रपती शिवराय मनामनात आणि शिवजयंती घराघरात अशी स्पर्धाही आयोजित करण्यात आली. यामध्ये घरी केलेल्या शिवजयंतीचा १ मिनिटाचा व्हिडिओ पाठवायचा होता.
छत्रपती शिवराय मनामनात..शिवजयंती घराघरात.. विजेते :
१) प्रथम क्रमांक-तनिष्का अजित कुमार पाटील
२) द्वितीय क्रमांक-वरुण सुनील वाळवेकर
३) तृतीय क्रमांक-प्रीतल विशाल सावळवाडे, अनुज पाटील
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताने सुरुवात झाली.यावेळी श्रेया महेश शेटे आणि श्रेयश वावरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना सांगितला.
भिलवडीच्या सरपंच विद्या पाटील, सीमा शेटे,विशाल सावळवाडे,घनश्याम रेळेकर, कपिल शेटे याचबरोबर मुख्याद्यापिका सुनीता माने,शिक्षिका सविता मगदूम,शीतल महाडिक,सागर कदम उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.