औदुंबर फाट्यावर मोठा अपघात l जनसंपर्क अधिकारी व पोलीसांची तात्काळ मदत
जनता न्यूज l दि.१९/२/२०२३
आज सकाळी 10.30 च्या दरम्यान औदुंबर फाट्याजवळ वेगनर ( MH-09 BX-3948) आणि इर्टिका ( MH-45 AQ-9292 ) या गाडीचा अपघात झाला.
दोन्ही चालकांना वळण लक्षात न आल्यामुळे हा अपघात झाला. इर्टिका गाडीच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे खरंतर मोठा अपघात टळला. अन्यथा जीवित हानी झाली असती.
समोरासमोर धडक झाल्यामुळे वेगनर गाडी पलटी झाली होती. त्या गाडीमध्ये एक गरोदर महिलाही होती.
भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि डॉ विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालयाचे भिलवडीचे अधिकारी सुभाष आरबुने घटनास्थळी होते.
या दोघांनीही सर्वप्रथम जखमींना धीर दिला आणि अत्यंत तातडीने त्यांनी दोन्ही गाडीतल्या जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी येथे पोलीस गाडीतूनच रवाना केले.
डॉ.विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालयाचे सुभाष आरबुने यांनी भारती हॉस्पिटल सांगली या ठिकाणी पुढील उपचाराचीही व्यवस्था केली.
जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे आता त्या सुखरूप आहेत अशी माहिती सुभाष आरबुने यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.