छत्रपती शिवराय मनामनात..शिवजयंती घराघरात..!
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी अर्थात 19 फेब्रुवारी रोजी आहे. आपण सर्वजण अत्यंत उत्साहाने आणि अभिमानाने ही शिवजयंती साजरी करणार आहोत यात कुठलीही शंका नाही.
दरवर्षीप्रमाणे या शिवजयंतीलाही आपण आपल्या पब्लिक ऍड्रेस सिस्टीमवरून प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करीत आहोत.
रविवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत ही स्पर्धा होईल.
आपण 7798778222 (📲 या क्रमांकावर क्लिक करुन थेट वॉटस ऍप वर रिप्लाय द्या.) या क्रमांकावर SMS किंवा व्हाट्सअप करून उत्तरं पाठवायची आहेत.
याचबरोबर
छत्रपती शिवराय मनामनात-शिवजयंती घराघरात हा उपक्रमही आयोजित करीत आहोत. आपण आपल्या घरी केलेल्या शिवजयंतीचा 1 मिनिटाचा व्हिडिओ वरील क्रमांकावरच पाठवायचा आहे. आपण घरी कशा पद्धतीने शिवजयंती साजरी केली हे जनता न्यूजच्या माध्यमातून आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत.
ज्यांनी वेगळ्या कल्पनेने शिवजयंती साजरी केलेली आहे अशा तीन क्रमांकांना बक्षीसंही दिली जाणार आहेत.
या दोन्ही स्पर्धेमध्ये आपण सहभाग घ्यावा आणि ही शिवजयंती दरवर्षीप्रमाणेच अपूर्व अभिमानाने उत्साहाने साजरी करावी असं आवाहन करीत आहे.सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा.
🚩🚩
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.