Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

शिष्यवृत्ती परीक्षेत क्षितिज गुरुकुल बुरुंगवाडीचे उज्वल यश

शिष्यवृत्ती परीक्षेत क्षितिज गुरुकुल  बुरुंगवाडीचे उज्वल यश 

( शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सुनिल जाधव व सौ.वनिता जाधव यांच्या हस्ते सत्कार करताना..!)

जनता न्यूज - भिलवडी | दि. १४/२/२०२३  


पाचवी व आठवी स्कॉलरशीप(शिष्यवृत्ती) परीक्षेत क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरुंगवाडीचे उज्वल यश ;१२ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले. 

बुरुंगवाडी,ता.पलूस येथील सिध्द विनायक शिक्षण संस्थेच्या क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन शाळेच्या बारा विद्यार्थ्यांनी पाचवी व आठवी स्कॉलरशीप(शिष्यवृत्ती) परीक्षेत सांगली जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक प्राप्त करून उज्वल यश प्राप्त केले आहे.

५ वी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थी :

प्रविण सुखदेव गाडे (270गुण.- जिल्हा गुणवत्ता यादीत 13 वा),ओम प्रमोद कणसे (266 गुण - जिल्हा गुणवत्ता यादीत 35 वा), अभिराज संजय मोकाशी( 262 गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत 55 वा),स्वराली सतीश नावडे (262 गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत 56 वी), विराज संदेश पाटील( 248 गुण - जिल्हा गुणवत्ता यादीत 156 वा),रागिणी नंदकुमार पाटील (238 गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत 226 वी),रुहिका अनिलकुमार राजमाने( 238 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत 231 वी)

८ वी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थी :

अंजली संतोष बुटाले.(224 गुण -जिल्हा गुणवत्ता यादीत 61 वी), वेदिका समीर चव्हाण(218 गुण - जिल्हा गुणवत्ता यादीत - 80 वी),स्वरांगी अशोक माने(204 गुण - जिल्हा गुणवत्ता यादीत 151 वी),सार्थक संभाजी जाधव(204 गुण - जिल्हा गुणवत्ता यादीत - 158 वा), संस्कार सतीश नावडे(204 गुण.जिल्हा गुणवत्ता यादीत -159 वा) 

यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव,कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनी अभिनंदन केले.गुणवंत विद्यार्थ्यांना रमेश हजारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विषय शिक्षक निशांत कोळेकर,स्नेहलता जमदाडे,स्वाती मोकाशी,विशाखा दळवी,या शिक्षकांसह मुख्याध्यापिका दिपाली जाधव,प्राचार्या स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.