अखिल भारतीय निमंत्रितांच्या हॉलीबॉल स्पर्धेत भिलवडी संघाला उपविजेतेपद
निमंत्रितांच्या अखिल भारतीय अरिहंत हॉलीबॉल चषक निपाणी (कर्नाटक) येथे दि.22 ते 24 जाने.2023 रोजी संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये गुजरात, कर्नाटक, बेंगलोरु, पुणे, महाराष्ट्र, केरळ, मुंबई, भिलवडी, निपाणी या आठ संघांचा समावेश होता.
या स्पर्धेमध्ये भिलवडीच्या संघाने सलग दोन सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य फेरी सामन्यांमध्ये भिलवडीच्या संघाने बेंगलोरु संघाचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीचा सामना भिलवडी विरुद्ध केरळ असा झाला.अत्यंत चुरशीने झालेल्या या सामन्यामध्ये भिलवडी संघाला हार पत्करावी लागली आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी भिलवडी संघाची खेळाडू कु.अक्षदा वावरे हिला बेस्ट स्मॅशर हे पारितोषिक मिळाले.
या संघाला प्रशिक्षक मोहन पाटील सुरज पाटील रघुनाथ हिरुगडे एम.आर.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.