Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

दुग्ध व्यवसायामध्ये चितळे बंधूंचं क्रांतिकारी पाऊल | सेक्सल सिमेन प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न

दुग्ध व्यवसायामध्ये चितळे बंधूंचं क्रांतिकारी पाऊल | सेक्सल सिमेन प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न 



जनता न्यूज - भिलवडी  | दि.२८/१/२०२३ 

भिलवडी येथील बी जी चितळे उद्योग समूहाच्या सेक्सल सिमेंट प्रयोगशाळेचे काल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 

चितळे उद्योग समूहाने आशिया खंडातील सर्वात मोठी सेक्सल सिमेन प्रयोगशाळा उभा करून दुग्ध व्यवसायामध्ये क्रांतिकारी पाऊल टाकलेलं आहे असे मत मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

चितळे डेअरीचे हे तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या समजण्यापलीकडे  जरी असले तरी नवीन पिढीला दिशादर्शक  हे काम आहे याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल.देशाच्या उद्योगाच्या प्रगतीसाठी या प्रयोगशाळेची सुरुवात करून चितळे डेअरीने पाया रोवला आहे. केंद्र सरकारच्या वतीने आम्ही डेअरीसाठी लागेल ती मदत करू असे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरद पवार म्हणाले. 


दुधाच्या धंद्यात ज्या काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्यात आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि ती चितळे कुटूंबांनी धरली आहे. आज त्यांनी जी नवीन सेक्सेल सिमन प्रयोगशाळा काढली आहे ती महत्त्वाची आहे. तयार झालेले प्रॉडक्ट त्याचा वापर देशात मोठ्या प्रमाणावर होऊ शकला तर दुधाचे अर्थशास्त्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आज भारत दूरदृष्टी असणारा देश आहे. देशात असणारा तीच गाय आणि तोच वळू आपण सातत्याने वापरतोय आणि त्याचा परिणाम म्हणून अधिक दूध देणाऱ्या गायी तयार होत नाहीत. यात बदल करायचा असेल तर असे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे.

इलेक्ट्रिक वाहनात बसून सर्वांनी प्रयोगशाळेची माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील श्रीनिवास पाटील माजी मंत्री जयंत पाटील विश्वजीत कदम अरुण लाड पृथ्वीराज देशमुख यांच्यासह नानासाहेब चितळे श्रीपाद चितळे विश्वास चितळे अनंत चितळे गिरीश चितळे मकरंद चितळे याच बरोबर चितळे कुटुंबाच्या चौथ्या पिढीचे निखिल अतुल पुष्कर आणि रोहन चितळे उपस्थित होते

८० वर्षांची परंपरा असलेली भारतातील अद्ययावत चितळे डेअरी आणि जगातील सर्वात मोठ्या बोवाईन जेनेटिक संस्थेच्या (एबीएस जीनस) यांच्या संयुक्त विद्यमाने या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सेक्सेल सिमेन हे भारतीय शेतकऱ्यांना योग्य किमतीत उत्कृष्ट अनुवंशिकतेसह दुधाचे उत्पन्न दुप्पट करण्यास निश्चितच वरदान ठरेल असा विश्वास सिमेन प्रयोगशाळा उद्घाटनादरम्यान चितळेंनी व्यक्त केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.