सांगली सायबर पोलीसांकडून ११० मोबाईल फोनचा शोध
जनता न्यूज - सांगली l दि. २५/१/२०२३
सांगली सायबर पोलीस ठाण्याकडून प्रजासत्ताक दिनाची अनोखी भेट हरवलेले तब्बल ११० मोबाईल मूळ मालकांना परत.
सांगली जिल्हयातील गहाळ झालेले १५,००,०००/- रू.किंमतीचा एकुण ११० मोबाईल फोनचा शोध घेवुन मुळ मालकांना परत करण्यात आले. सांगली सायबर पोलीस ठाणे कडून जनतेस अनोखी भेट देण्यात आली.
सन २०२१ पासून नागरिकांचे मोबाईल संच ठिकठिकाणी गहाळ झाले होते. पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी सांगली सायबर पोलीस ठाण्याकडून माहिती घेऊन जिल्हयातून गहाळ झालेल्या,चोरीला गेलेल्या मोबाईल फोनची शोध मोहीम घेऊन जास्तीतजास्त मोबाईल नागरिकांना परत करावेत याबाबत सुचना दिल्या होत्या.
ज्या लोकांचे मोबाईल फोन सापडले आहेत त्यांच्या कागदपत्रांची ओळख पटवून पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली,पोलीस निरीक्षक सतिश शिंदे,पोलीस उपनिरिक्षक रोहिदास पवार व सायबर पोलीस ठाणेचे सर्व पोलीस अमंलदार यांच्या उपस्थितीत त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले.
हरवलेला मोबाईल फोन मिळेल असे अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल फोन मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सांगली पोलीस दलाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. मोबाईल फोन परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता.
ही मोहीम पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली,अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरिक्षक रोहीदास पवार,पोलीस अमंलदार करण परदेशी,महादेव घेरडे,अमिन सय्यद, संदिप पाटील,प्रकाश पाटील,सचिन कोळी,अजय पाटील,अमोल क्षिरसागर, कॅप्टनसाहेब गुंडवाडे,सुनिल मदने, स्वप्निल नायकवडे,विवेक सांळुखे, श्रीधर बागडी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अमंलदार सचिन कनप, विकास भोसले,राहुल लोखंडे, इस्लामपुर पोलीस ठाण्याचे पोलीस अमंलदार अमोल सावंत,अलमगीर लतीफ, मिरज शहर पोलीस ठाण्याचे सचिन सनदी, कडेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस अमंलदार शिवाजी माळी, आष्टा पोलीस ठाण्याचे अमोल शिदे, नितीन पाटील, शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस अमंलदार नितीन यादव,महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे बसवराज कुंदगोळ,विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस अमंलदार धिरज यादव यांनी मदत केली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी पथकाचे विशेष अभिनंदन करुन भविष्यात देखील सायबरच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त मोबाईल फोन नागरीकांना परत करण्यातबाबत सुचना दिल्या असुनही मोहीम भविष्यात देखील सतत राबविण्यात येणार आहे अशी माहिती दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.