
गेली सुमारे 40 वर्षे गीत संगीताची सेवा करणाऱ्या संगीत विशारद सौ. प्राजक्ता प्रमोद कुलकर्णी यांना नारीशक्ती पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. आनंदगंगा फाउंडेशन मिणचे यांच्यावतीने या पुरस्काराचे वितरण झाले.
भिलवडी सारख्या खेडेगावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी संगीतातील गुरुवर्य पं.पांडुरंग बुवा गुळवणी यांचेकडे शिक्षण घेऊन ‘संगीत विशारद’ पदवी प्राप्त केली.त्यांनी तासगांव येथे ‘स्वरगंधा संगीत निकेतन’ या नावांने शास्त्रीय गायनाचे क्लासेस सुरु केले. ही सेवा करताना त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचं प्रोत्साहन मिळाले.
शाळेमध्ये संगीताच्या शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांना आकाशवाणीवरही महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली.या क्षेत्रामध्ये आवड असणाऱ्या महिलांना एकत्र करून त्यांनी गावामध्ये भजनी मंडळ ही सुरू केले.त्यालाही खूप मोठा नावलौकिक मिळाला.

अनेक मुला मुलींना त्यांनी संगीताचे धडे दिलेले आहेत.वयाच्या साठीत ही त्यांची ही सेवा अखंडपणे सुरू आहे आणि याचीच दखल घेऊन त्यांना नारीशक्ती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.