औदुंबर येथे ८० वे सदानंद साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
जनता न्यूज - अंकलखोप | दि .१५ / १ / २०२३
"सध्या लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याने मानवनिर्मित अंधार दाटत चालला आहे, अशा काळात साहित्यिकांनी समाजाच्या विविध घटकांमध्ये प्रेम, विश्वास आणि सामंजस्य निर्माण करणे गरजेचे आहे.
असे प्रतिपादन प्राचार्य यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले.औदुंबर - अंकलखोप येथील 80 व्या सदानंद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
ते म्हणाले, " लोकशाही मूल्यांच्या सबलीकरणासाठी औदुंबरचे साहित्य संमेलन प्रेरक ठरेल हा विश्वास वाटतो. माणसाला भाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्काने मिळतात. मातृभाषा ही शिक्षण, ज्ञान आणि संस्कृती यांच्या विकासासाठी प्रेरक असते. जे ज्ञान मातृभाषेतून मिळते त्याला संस्कृतीचा सुगंध असतो. साहित्यिक हे संस्कृतीचे भाष्यकार असतात.माणसाला सध्या प्रचंडपणाच्या वेडाने ग्रासले आहे. पैसा, गाडी, बंगला, महागड्या वस्तू अशा प्रचंडपणाच्या नादात तो साधेपणातला उत्कट आनंद गमावत चालला आहे."
कवी सुधांशु पुरस्कार मोहन काळे (नवी मुंबई) 'थेंबांनी विणली नक्षी' या कविता संग्रहास व कै. सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार- प्रा. यशवंत पाटील, (नाशिक) यांना 'कवितेच्या पारंब्या या कवितासंग्रहासाठी संमेलनाध्यक्ष प्रा. पाटणे यांच्याहस्ते देण्यात आले.
यावेळी उद्योजक गिरीष चितळे, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा.डॉ. प्रदिप पाटील, उपसरपंच रोहिणी चौगुले, रमजान मुल्ला, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष प्रकाशराव पवार, संदीप सूर्यवंशी, आप्पासो पाटील आदींसह साहित्यरसिक उपस्थित होते.
सदानंद साहित्य संमेलनाचे उद्धाघाटन प्रमुख पाहुणे प्रा. यशवंत पाटणे यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते कै.सदानंद सामंत, कवी सुधांशु, म.भा.भोसले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत शहाजी सूर्यवंशी, अध्यक्षांचा परिचय सुभाष कवडे यांनी दिला .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.