Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

मानवामधला देवाचा दूत-डॉ.विश्वजीत कदम

मानवामधला देवाचा दूत-डॉ.विश्वजीत कदम 

जनता न्यूज / भिलवडी - सांगली 

लेख : सिकंदर फकीर - दोहा / कतार.

महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू

डॉ.विश्वजीत (बाळासाहेब) कदम यांचा आज १३ जानेवारी रोजी वाढदिवस.  आज या मंगल दिवसाचं औचित्य साधून माझ्या अनुभवातले बाळासाहेब तुमच्या समोर या लेखाच्या माध्यमातून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न...

२००३ साली माझं इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झालं आणि नेमकं त्याच वर्षी इंडस्ट्रियल सेक्टर  मध्ये मंदीचं वातावरण निर्माण झालं. अश्या परिस्तिथी मध्ये नोकरी शोधणे म्हणजे पालत्या घागरीवर पाणी ओतण्याचा प्रकार होता. पुणे मध्ये जाऊन खूप ठिकाणी प्रयत्न केलं पण काही उपयोग होत नव्हता. माझ्या शिक्षणानंतर स्वतः मी आणि माझ्या घरच्यांनी ज्या नोकरी बदलाच्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या कुठे हि आसपास सुद्धा दिसत नव्हत्या. घरच्या जवाबदारीचा गाडा ओढण्यासाटी आता काही करून नोकरी मिळवणं अनिवार्य झालं होत. त्यावेळी मी परमेश्वर चरणी एकच प्रार्थना करीत होतो की मला लवकरात लवकर नोकरी मिळू दे. मला असं वाटतं ज्या वेळी देव खूप व्यस्थ असतो ना तेव्हा त्याचा मर्जीतील निवडक मंडळी तो " देवदूताच्या" रूपात पाठवतो. माझ्या आयुष्यात पण एक देवदूत आहे ज्याने आयुष्ययाच्या एका खडतर वाटेवर मला मदतीचा फक्त्त हातच नाही तर आयुष्यभरा साठी लागणारी आत्मविश्वासाची शिदोरी मला बांधून दिली आणि ते म्हणजे आपले “बाळासाहेब”. सन १९९९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात एका  नवीन उमद्या , संयमी आणि कृतिशील युवक स्वतःला आजमावत होता ते होते “बाळासाहेब”. सन २००३ मध्ये ज्या वेळी पहिल्या वेळेस त्यांना भेटण्याचा योग्य सांगली मध्ये आला. त्यावेळी माझ्या समोरील अडचणीचा पूर्ण पाढा मी त्याच्या समोर मांडला.



माझी गरज ओळखून ते एकाच वाक्य बोलले  “ काम होऊन जाईल काळजी करू नको “ त्यांचं ते संयमी उत्तर थोडा वेळ मनात एक प्रश्न निर्माण करून केलं खरंच करतील का हे माझं काम ? . पण काही दिवसातच मला पुण्याला घरी भेटीला यायचा निरोप आला. आज पण मला तो दिवस पूर्णपणे चांगला आठवतोय. सकाळची वेळ डेक्कन च्या बंगल्यावर मी पोहचलो. बाळासाहेबांनी वरच्या केबिन मध्ये मला बोलवलं. सरळ फोन उचला आणि त्यांचं संभाषण चालू झालं. एक पुण्या मधल्या सगळ्यात मॊठ्या  कंपनीच्या चेअरमनशी “माझा माणूस पाठवतोय मुलाखतीसाठी त्याच काम करा. तुम्हाला त्यांचा पुढे फायदा होईल” .ती एक डील होती आणि त्याची किंमत येणाऱ्या काळात बाळासाहेबांना द्यावी लागणार होती. ह्याची मला जाणीव झाली होती आणि हे सगळं चालू होत माझ्या सारख्या एका सामान्य घरातील युवकांसाठी. एका कागदावर कंपनीला कस जायच ह्याचा नकाशा त्यांनी काढून दिला. जाताना मला त्यांचा मोबाइल नंबर दिला आणि बोले काही हि अडचण आली तर फोन कर. बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुलखातीला मी गेलो आणि तो दिवस होता १३ जानेवारी.पण खेड्यातून आलेला मी. आत्मविश्वासाची कमी. ह्या मुळे फारसं काही मला मुलाखती मध्ये चमक दाखवता आली नाही. नोकरी साठी बोलावतील कि नाही हि शंका घेऊनच बाहेर पडलो . त्या दिवशी बाळासाहेबचा वाढदिवस कडेगाव मध्ये खूप जोरात चालू होता. निराश होतो म्हणून बाळासाहेबाच्या मोबाइल वर मेसेज टाकला कि आज मुलाखत झाली. रात्री माझ्या मोबाइलची रिंग वाजली. माझ्या मित्राने फोन उचला समोरून आवाज होता  “मी बाळासाहेब बोलतोय. माझा मित्र बोला कोणी तरी बाळासाहेब बोलतायत.  क्षण भर हातापायाला मुंग्या आल्या. महाराष्ट्र राज्याच्या सगळ्यात मॊठ्या नेत्यांचा मूलगा स्वताच्या वाढदिवसाचा धामधुमीत सुद्धा माझ्या साठी फोन करतोय. त्यांच्या फोन नंतर एक गोष्ट मात्र नक्की समजली  दिलेल्या शब्दाची जान ठेवणं हे रक्त्ता मध्ये आसव लागत. ते उसण मिळत नाही आणि येणाऱ्या भविष्यकाळा मध्ये मोठया साहेबाच्या पाऊल वर पाऊल ठेवणार एक महाराष्ट्रचे भविष्य माझ्या डोळ्या समोर उभा राहील होत.

मला नोकरी साठी बोलवण्यात आलं आणि माझ्या आनंदाला आकाश सुद्धा ठेंगणं पडू लागलं , पेढे घेऊन धावत धावत भारती भवन गाठलं. नेहमी प्रमाणे बाळासाहेंबाना भेटणाऱ्याची खूप गर्दी होती तरी पण माझी भेट झाली.त्यांनी केलेल्या माझ्या वरील उपकारामुळे खूप भारावून गेलो होतो आणि त्या आवेशा मध्ये मी त्याना बोलून गेलो,येणाऱ्या भविष्यात तुमच्या साठी मला जे काही करता येईल ते मी करेन.  पण ह्याच्यावर वरील त्यांची प्रतिक्रिया ज्या मुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं  बाळासाहेब बोलले “मी तुला नक्की काम सांगेन माझ्या साठी काम करायला,पण तू स्वतःला पहिला सिद्ध कर जे तुला काम भेटले आहे. त्या नोकरी मध्ये असं काही तरी करून दाखव कि मला तुझा अभिमान वाटेल” त्यांचा मुखांतून निघणारा प्रत्येक शब्द माझ्यामधल्या जिद्दीला , कर्तुत्वाला जाग करत होता.

 आता आयुष्यच एकच ध्येय होत बाळासाहेबाच्या पुढे काही तरी बनून जायचं आणि मग त्यांना बोलायचं आता मला काम सांगा. तुमच्या साठी काय करायचं. कामाला लागलो खूप मेहनत केली. कधी कंटाळा आला तर बाळासाहेबांचे शब्द आठवायचे पुन्हा जोश यायचा  आणि काही वर्षांनतर उभा राहिलो बाळासाहेबाच्या समोर. माझ्या कारकिर्दीचा पाढा वाचला  “साहेब तुम्ही मला नोकरी देऊन माझ्यावर मोठे उपकार केलेत  पण माझ्या मधली जिद्द आणि कर्तृत्वला तुम्ही जाग करून तुम्ही माझ्या आयुष्यच कल्याण केलं. जगातील पाच वेगवेगळ्या देशामध्ये मध्ये काम करून आलो आता तरी मला सांगा तुमच्या साठी काय करून उपकार कमी करू. “त्या वर त्याच्या उत्तराने मला एक गोष्ट नक्की समजली देव माणसामध्ये पण असतो.बाळासाहेब बोलले “ हे सगळं तुझं कष्ट आहे तुला मी संधी दिलीस त्याच तू सोनं केलंस आणि तुला जर उपकार च कमी करायचे असतील तर समाजातील गरजू साठी काही तर कर” पुन्हा एकदा बाळासाहेब तुम्ही मला जिंकलं तुम्ही किती हि मोठे राजकारणी असला तरी एक माणूस म्हणून सर्वक्षेष्ठ आहात.आमच्या सारख्या हजारो लोकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. ज्यांच्या आयुष्यच तुम्ही कल्याण केलं.

माझं मूळ गाव पलूस तालुक्यातील भिलवडी म्हणजेच बाळासाहेबांच्या मतदारसंघातील.पण मी सध्या दोहा कतार या ठिकाणी नोकरीस आहे. माझं संपूर्ण आयुष्यच आज बदलून गेलेले आहे. समाजामध्ये नोकरीच्या निमित्ताने जी काही किंमत मला प्राप्त झाली, जो काही मान सन्मान प्राप्त झाला. त्याचे सारे श्रेय प्रारंभीच्या काळामध्ये ज्यांनी मला अनमोल असं सहकार्य केले ते डॉ.विश्वजीत कदम यांचं. 

आज तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.