सत्ता असो नसो विकासकामात अग्रेसर राहू : आ. डॉ. विश्वजीत कदम
जनता न्यूज - भिलवडी l दि.३/१/२०२३
भिलवडी ग्रा.पं. तर्फे आयोजीत विविध सत्कार व साहित्य वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
भिलवडी ग्रा.पं. तर्फे घरोघरी फिनाईल व डस्टबीन वाटप तसेच खेळाडूंना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. नवनिर्वाचीत सरपंचांचे सदिच्छा सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.महेंद्र आप्पा लाड यांनी नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांकरीता प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली.
डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या विचाराने मतदार संघात सर्वजण कार्यरत आहोत. सत्ता असो नसो विकासकामात सातत्याने अग्रेसर राहू असा विश्वास माजी मंत्री आ. डॉ.विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.
यावेळी वसगडेच्या वृषाली काशीद, ब्रम्हनाळच्या गीताताई गायकवाड, खटावचे ओंकार पाटील, सुखवाडीचे बाळासो यादव, चोपडेवाडीचे प्रशांत माने आणि हजारवाडीचे सर्जेराव यादव या भिलवडी जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचीत सरपंचांचे सदिच्छा सत्कार करण्यात आले.
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले पलूस कडेगाव तालुक्याचे भाग्यविधाते डॉक्टर पतंगराव कदम लोकनेते बाळासाहेब काका पाटील यांना अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी देण्यात येणाऱ्या डस्टबिन आणि फिनाईलचे वाटप प्राथमिक स्वरूपामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुष्यमान भारत कार्ड आणि ई-श्रम कार्डचेही वाटप ग्रामस्थांना करण्यात आले.
भिलवडीतील हॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट खो खो आणि कराटे पटूंना भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना लागणाऱ्या खेळाचे साहित्यही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
पलूस तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब मोहिते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष धनंजय पाटील, सांगली अर्बन बँकेचे सल्लागार शहाजी गुरव, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासो मोहिते, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बी.डी. पाटील, दलित महासंघाचे पलूसचे अध्यक्ष नितीन मोरे, जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त श्रावणी मोकाशी, खंडेश्वरी पाणीपुरवठा संस्था क्रमांक दोनचे चेअरमन दादासो किणीकर, जायन्ट्स ग्रुप भिलवडी सहेलीच्या अध्यक्षा सीमाताई शेटे यांचा विश्वजीत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच विद्या सचिन पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, जि.प.सदस्य संग्राम पाटील, उद्योजक गिरीश चितळे, मकरंद चितळे, चंद्रकांत पाटील, मोहन तावदर, विलास पाटील, यांच्यासह ग्रा.पं. सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविक बी.डी.पाटील व सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.