
प्लास्टिकमुक्ती साठी भिलवडी-माळवाडी येथील महिलांची चळवळ सुरू | व्यापारी एकता असो.च्या पदाधिकाऱ्यांचे बळ
प्लास्टिकमुक्ती साठी भिलवडी-माळवाडी येथील महिलांची चळवळ सुरू आहे. त्याला आज व्यापारी संघटना आणि व्यापारी एकता असो.च्या पदाधिकाऱ्यांनी बळ दिले.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर आणि व्यापारी एकता असो.चे सचिव सचिन नावडे यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे. त्यांना लागेल त्या साईज मध्ये आमच्या भिलवडी माळवाडीतल्या भगिनींनी पिशव्या तयार करून दिल्या.
औदुंबरचे सुहास पाटील यांनी प्लास्टिकमुक्तीचा जनजागर करीत कापडी पिशव्यांना प्राधान्य दिले.संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश दादा पाटील आणि व्यापारी एकता असो.चे अध्यक्ष महेश शेटे यांनी सुद्धा हजार पिशव्यांची ऑर्डर दिलेली आहे.
या निमित्ताने आमच्या व्यापारी बंधू-भगिनींना विनंती आहे..प्लास्टिक मुक्तीला बळ देण्यासाठी आपण कृपया कापडी पिशव्यांचा वापर करा.अत्यल्प दरामध्ये या पिशव्या आम्ही उपलब्ध करून देत आहोत. आपल्याला लागेल ती साईज आणि अगदी दोनच दिवसांमध्ये आम्ही आपल्याला पिशव्या तयार करून देऊ.
भिलवडी-माळवाडीतल्या भगिनींच्या प्लास्टिकमुक्तीच्या या उपक्रमाला मोलाची साथ दिल्याबद्दल सुहास पाटील, व्यापारी संघटना, व्यापारी एकताच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.